दसरा मराठी निबंध Essay on Dussehra in Marathi

Essay on Dussehra in Marathi हा निबंध आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांत लिहून देणार आहोत. तुम्ही यापैकी कोणताही निबंध तुमच्या परीक्षेमध्ये वापरू शकता.

दसरा हा भारतातील महत्वाच्या सणांपैकी एक आहे. हा सण हिंदू अश्विन महिन्याच्या दशमीला साजरा केला जातो आणि या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला होता, म्हणून या सणाला ‘विजयादशमी’ असेही म्हणतात.

Essay on Dussehra in Marathi

दसरा वर १० ओळीत मराठी निबंध 10 lines on Dussehra Essay in Marathi

Set 1 is helpful for students of Classes 1, 2, 3 and 4.

  1. दसरा हा भारतातील एक प्रसिद्ध व हिंदूंचा एक प्रमुख सण आहे.
  2. अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो.
  3. दसर्‍याच्या आधी नऊ दिवस नवरात्र असते, दसरा हा नवरात्रीचा दहावा दिवस असतो, या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता.
  4. या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला होता, म्हणून या सणाला विजयादशमी म्हणूनही ओळखले जाते.
  5. या दिवशी काही ठिकाणी रामलीलेचे आयोजन केले जाते, तर काही ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम असतो.
  6. रावण दहनाच्या कार्यक्रमात रावण, कुंभकर्ण आणि मेघानाथाचे पुतळे जाळले जातात.
  7. दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांना ‘सोने’ म्हणजे आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतात.
  8. या दिवशी लोक आपल्या घरातील तसेच आपल्या कामाच्या ठिकाणी यंत्रसामग्रीची पूजा करतात.
  9. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे चांगले मानले जाते, म्हणून लोक नवनवीन वस्तू खरेदी करतात.
  10. अशा प्रकारे हा सण आपल्याला वाईटावरील चांगल्याच्या विजयाचा संदेश देतो.

दसरा मराठी निबंध Essay on Dussehra in Marathi (१०० शब्दांत)

Set 2 is helpful for students of Classes 5, 6, 7 and 8.

दसरा हा भारतातील महत्वाच्या सणांपैकी एक आहे. हा सण हिंदू अश्विन महिन्याच्या दशमीला साजरा केला जातो आणि या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला होता, म्हणून या सणाला ‘विजयादशमी’ असेही म्हणतात.

दसरा हा नवरात्रीचा दहावा व अंतिम दिवस असतो. या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता, म्हणूनही या दिवसाचे महत्व आहे. या दिवशी लोक एकमेकांना भेटून आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतात.

या दिवशी विविध ठिकाणी रामलीलेचे किंवा रावण दहनाचे आयोजन केले जाते. त्यात रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथाचे पुतळे जाळले जातात. दसऱ्याच्या दिवशी यंत्राची पूजा करण्याचेही महत्व आहे, म्हणून या दिवशी सर्व ठिकाणी यंत्र व यंत्रसामग्रीची पूजा केली जाते. तसेच या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याचेही महत्व आहे, म्हणून लोक नवनवीन वस्तू खरेदी करतात.

अशा प्रकारे दसरा हा सण लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो.


दसरा मराठी निबंध Essay on Dussehra in Marathi (२०० शब्दांत)

Set 3 is helpful for students of Classes 9, and 10.

दसरा हा हिंदूंचा एक महत्वाचा सण आहे जो दरवर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हा पारंपारिक सण सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये म्हणजेच हिंदू अश्विन महिन्याच्या शुद्ध दशमीच्या दिवशी साजरा केला जातो. या सणाला विजयादशमी असेही म्हणतात.

दसऱ्याचे मोठे धार्मिक महत्व आहे. हा दिवस नवरात्रीचा अंतिम दिवस असतो, या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध करून त्याच्या अहंकाराचा नाश केला होता. तसेच या दिवशी श्रीरामांनी अहंकारी रावणाचाही पराभव करून सीतामातेची त्याच्या तावडीतून सुटका केली होती. या दोन चांगल्या घटनांमुळे दसऱ्याचे खूप महत्व आहे. हा सण आपल्याला वाईटावरील चांगल्याच्या विजयाची आठवण करून देतो.

दसऱ्याच्या दिवशी विविध ठिकाणी रामलीलेचे तसेच रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. लोक मोठ्या संखेने या कार्यक्रमांना उपस्थित असतात. रामलीलेच्या कार्यक्रमात रामायणाचा अभिनय केला जातो तर रावण दहनात रावण, कुंभकर्ण व मेघनाथाच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते.

दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याचे महत्व आहे, म्हणून या दिवशी लोक नवीन कपडे, सोने व इतर वस्तू खरेदी करतात. संध्याकाळी लोक एकमेकांना भेटतात व आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतात, मिठाई वाटतात, आपल्या मनातील आनंद व्यक्त करतात.

दसऱ्याच्या दिवशी यंत्रांची व यंत्रसामग्रीची पूजा करण्याचेही महत्व आहे, म्हणून या दिवशी औद्योगिक वसाहतीत तसेच लोक आपल्या कामाच्या ठिकाणी आणि घरी असलेल्या यंत्रांना स्वच्छ करून त्यांची पूजा करतात.

अशा प्रकारे दसरा लोकांच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह आणतो व तसेच त्यांना एक चांगला संदेश देऊन आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो.


दसरा मराठी निबंध Essay on Dussehra in Marathi (३०० शब्दांत)

Set 4 is helpful for students of Classes 11, 12 and Competitive Exams.

आपल्या देशात अनेक सण साजरे केले जातात. यामध्ये आपल्याला देशाची सभ्यता आणि संस्कृतीची झलक दिसते. हे सण जीवनात नवीनता आणि चैतन्य आणतात. दसरा हा या महत्वाच्या सणांपैकी एक आहे. दसरा किंवा दशहरा म्हणजे रावणाचा पराभव. या दिवशी श्रीरामांनी अहंकारी रावणाचा पराभव केला होता. या आठवणीत हा सण साजरा केला जातो. म्हणून या सणाला विजया दशमी असेही म्हणतात. हा सण अश्विन मासाच्या दशमीला साजरा केला जातो.

हा सण नवरात्रीचा दहावा आणि अंतिम दिवसही असतो. या दिवशी देवीची पूजा करून देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. याच दिवशी दुर्गा देवीने नऊ दिवसाच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला होता आणि श्रीरामानेही दुष्ट लंकाधीश रावणाचा वध करून सीतामातेला त्याच्या तावडीतून सोडवले होते. म्हणूनच हा दिवस आपल्याला असत्यावरील सत्याच्या आणि अन्यायावरील न्यायाच्या विजयाचा संदेश देतो.

हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. बंगालमध्ये या दिवशी दुर्गापूजा केली जाते, लोक महिषासुरमर्दिनी दुर्गामातेची आराधना करतात, तर उत्तर भारतात या दिवशी रामलीलेचा उत्साह असतो, लोक रामायणाचा अभिनय करून लोकांना चांगला संदेश देतात, मिरवणुका काढल्या जातात तसेच रावण दहनही केले जाते, तर महाराष्ट्रातही या दिवशी रावण दहन केले जाते, रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते, चारही बाजूंना उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असते.

दसऱ्याच्या दिवशी घरे व दुकाने स्वच्छ करून फुलांनी सजवली जातात, घरात विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात, घरात उत्साहपूर्ण वातावरण असते. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे चांगले मानले जाते, म्हणूनच लोक या दिवशी नवीन कपडे, सोने तसेच इतर अनेक मौल्यवान वस्तू खरेदी करतात. संध्याकाळी लोक नवीन कपडे घालून एकमेकांना भेटायला जातात आणि आपट्याची पाने देऊन एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. लोक मिठाई वाटून आपल्या मनातील आनंद व्यक्त करतात. लहान मुलांच्या उत्साहाला तर या दिवशी सीमाच नसते.

दसऱ्याला योद्ध्यांचा सण असेही म्हणतात. या दिवशी लोक शस्त्रस्त्रांना स्वच्छ करतात त्यांची पूजा करतात. तर काही लोक आपल्या कामाच्या ठिकाणी आणि घरी असलेल्या यंत्रांना स्वच्छ करून त्यांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात.

दसरा देशातील विविध भागात विविध प्रकारे जरी साजरा केला जात असला तरी हा सण साजरा करण्याचे प्रमुख कारण म्हणजे लोकांचे जीवन आनंद आणि उत्साहाने भरणे, त्यांना चांगला संदेश देऊन आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित करणे आहे.


दसरा मराठी निबंध Essay on Dussehra in Marathi (४०० शब्दांत)

Set 5 is helpful for students of Classes 11, 12 and Competitive Exams.

दसरा हा शरद ऋतूतील एक मुख्य सण आहे. हा सण अश्विन शुक्ल दशमीला साजरा केला जातो. त्याला विजया दशमी असेही म्हणतात. हा हिंदूंचा एक महत्वाचा सण आहे आणि सर्व हिंदूं हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या सणाचा क्षत्रियांशी एक विशेष संबंध आहे.

संबंधित पौराणिक कथा

प्राचीन काळात पावसाळा यात्रेसाठी अनुकूल मानला जात नसे. साधू, महात्मा, धर्मोपदेशक, व्यापारी, राजा-महाराजा  आपापल्या स्थानी दसरा साजरा करायचे. साधूंचे एक विशिष्ट स्थान नसल्याने ते एखाद्या चांगल्या स्थानी चातुर्मास करायचे. बुद्धदेवांच्या चातुर्मासांचे बौद्ध ग्रंथात वर्णन केलेले आहे. अजूनही काही साधू चातुर्मास साजरा करतात. वर्षा ऋतूनंतर आणि  शरद ऋतूच्या सुरुवातीला व्यापारी प्रवासासाठी बाहेर जातात.

क्षत्रिय लोक या शुभ दिवशी आपल्या विजय यात्रेसाठी निघतात. हा एक उत्साहाचा दिवस असतो. शरद ऋतूत काळे ढग नाहीसे होतात आणि निरभ्र स्वच्छ आकाश माणसाच्या मनात आशेचे संचार करते. या चांगल्या नैसर्गिक बदलांमुळे हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी नवीन कार्याचा विजयश्री करण्यास शुभ मानले जाते. श्री रामचंद्रांनी या दिवशी बालीचा वध करून चार मास प्रस्रवण पर्वतावर घालवले होते.

शरद ऋतूत कार्तिक मासात त्यांनी श्री हनुमानाला सीता मातेचा शोध घेण्यासाठी पाठविले होते आणि मग रावणाला मारून चैत्र शुक्ल नवमीला अयोध्येत परत आले होते. या दिवशी प्रभू रामचंद्रांनी लंकेचा राजा रावणावर विजय मिळवला होता असे मानले जाते. म्हणून हा दिवस विजया-दशमी म्हणून ओळखला जातो.

साजरा करण्याच्या पद्धती

दसरा हा रामलीलेचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी रावणाच्या वधाचा अभिनय केला जातो. या दिवशी रावणाच्या मूर्तीचे दहन केले जाते. याव्यतिरिक्त फटाकेदेखील वाजविले जातात. मोठ्या शहरांमध्ये, दसराच्या 15 दिवस आधीपासून रामलीलेचा उत्साह असतो. कुठे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्रजी यांच्या जीवनाचा अतिशय आकर्षतेने अभिनय केला जातो आणि यात संगीतासह रामायणाचा पाठ केला जातो. रामलीला पाहिल्यावर भक्तांच्या हृदयात भक्ती जागृत होते आणि ते उत्साहाने श्रीरामचंद्र की जय बोलतात.

दसरा हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही राज्यांमध्ये या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. बिहार आणि पश्चिम बंगालच्या काही भागात दुर्गा पूजा केली जाते. पहिल्या नऊ दिवसांना नवरात्र म्हणतात. या दिवसांमध्ये देवीची विविध प्रकारे पूजा केल्यावर, दसऱ्याच्या दिवशी शेवटची पूजा करून मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यानंतर लोक एकमेकांना भेटतात. दसऱ्याच्या दिवशीच दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला, म्हणूनही त्याला विजया दशमी म्हणतात असे मानले जाते.

पारंपारिक महत्व

या सणाला मोठे पारंपारीक महत्त्व आहे. हा दिवस त्या काळाची आठवण करून देतो,  जेव्हा आर्य जातीने आपली संस्कृती इतर देशांमध्ये पसरविली होती आणि ज्या दिवशी एका आर्य राजाने सर्व प्रबळ राजांवर विजय प्राप्त करून आर्य साम्राज्यचा मान राखला होता.  ते भारताच्या भरभराटीचे दिवस होते. तेव्हाच्या पुण्य स्मृतींनी आजही आपल्यात वांशिक अभिमान वाढतो.

मानवी जीवनावरील परिणाम

मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रजी यांच्या पवित्र विधींचे अनुकरण केल्याने आपल्या अंतःकरणात पितृभक्ती आणि त्यागाची भावना निर्माण होते. लक्ष्मण आणि भरताचे बंधुप्रेम, सती सीतेचा पतिव्रत धर्म आणि वीर हनुमानाचा उत्साह आणि सेवाभाव यांचेकडून आपल्याला प्रोत्साहन मिळते. हा उत्सव साजरा केल्याने आपल्या अंतःकरणातील वीर उपासनेची भावना मजबूत होते आणि आपले जीवन सुसंघटित होते.


तर मित्रांनो दसरा मराठी निबंध Essay on Dussehra in Marathi Language हा निबंध तुम्हाला आवडलाच असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला सुद्धा हा निबंध Share करू शकता, धन्यवाद.


Share:

About Author:

या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषण, अनमोल विचार, आणि वाचण्यासाठी कथा मिळेल. तुम्हाला काही माहिती लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.