शिक्षक दिन मराठी निबंध व भाषण Essay on Teacher’s Day in Marathi

Essay on Teacher’s Day in Marathi हा निबंध आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांत लिहून देणार आहोत. तुम्ही यापैकी कोणताही निबंध तुमच्या परीक्षेमध्ये वापरू शकता.

माणसाच्या आयुष्यात गुरुचे महत्व अनन्य आहे. कारण गुरुच शिष्याचे आयुष्य घडवतो. म्हणूनच गुरूच्या या महान कार्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी देशभर शिक्षक दिन साजरा केला जातो.

Essay on Teacher's Day in Marathi

शिक्षक दिन वर १० ओळीत मराठी निबंध 10 Lines on Teacher’s Day Essay in Marathi

Set 1 is Helpful for Students of Classes 1, 2, 3 and 4.

  1. शिक्षक दिन हा शिक्षकांच्या समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या योगदानाला समर्पित केलेला एक विशेष दिवस आहे.
  2. भारतात शिक्षक दिन दरवर्षी ५ सप्टेंबरला साजरा केला जातो.
  3. या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला.
  4. डॉ. राधाकृष्णन हे एक आदर्श शिक्षक, प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती होते.
  5. १९६२ पासून आपण डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करीत आहोत.
  6. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षक सर्वात आदरणीय व्यक्ती असतो.
  7. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षणासंबंधित वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.
  8. या दिवशी मोठ्या इयत्तेतील विद्यार्थी लहान मुलांना शिकवून शिक्षण दिन साजरा करतात.
  9. विद्यार्थी या दिवशी आपल्या शिक्षकांना आदराने फूल आणि भेटवस्तू देतात.
  10. विद्यार्थी शिक्षकांचा सत्कार करतात आणि त्यांचे जीवन व विचारज्ञान वाढवण्याबद्दल त्यांचे आभार मानतात.

शिक्षक दिन मराठी निबंध व भाषण Essay on Teacher’s Day in Marathi (१०० शब्दांत)

Set 2 is Helpful for Students of Classes 5, 6, 7 and 8.

शिक्षक दिन हा शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सर्वात महत्वाच्या दिवसांपैकी एक आहे. दरवर्षी पाच सप्टेंबरला देशभरातील शाळा आणि महाविद्यालये शिक्षक दिन साजरा करतात. या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता.

या दिवशी विद्यार्थी शिक्षकांनी दिलेल्या मौल्यवान ज्ञानाबद्दल त्यांचे कृतज्ञतेने आभार मानतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी जे अथक परिश्रम करतात त्याबद्दल कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या मनातील शिक्षकांबद्दलचा आदर आणि शिक्षकांचे विद्यार्थ्यांवरील प्रेम दर्शविणारा हा एक उत्तम दिवस असतो.

विद्यार्थ्याच्या यशामागील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्याचे गुरु. शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना उच्चतम ज्ञान देऊन आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतात. शिक्षकांच्या मदतीशिवाय आणि त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय विद्यार्थ्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी योग्य दिशाच मिळणार नाही. शिक्षक प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकतात. शिक्षकाशिवाय कोणत्याही व्यक्तीचे जीवन अपूर्ण आहे.


शिक्षक दिन मराठी निबंध व भाषण Essay on Teacher’s Day in Marathi (२०० शब्दांत)

Set 3 is Helpful for Students of Classes 9, and 10.

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात गुरूला एक महत्वाचे स्थान असते. गुरुविना कोणत्याही व्यक्तीचे जीवन अपूर्ण असते. म्हणूनच या गुरुंचे त्यांनी आपल्यासाठी केलेल्या परिश्रमाचे आभार मानण्यासाठी दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि थोर शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना समर्पित आहे. हा त्यांचा जन्मदिवस असतो त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९८८ रोजी झाला होता.

शिक्षक दिन हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय दिवस असतो. हा एक असा दिवस असतो जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांसाठी दररोज घेत असलेल्या परिश्रमासाठी त्यांचा सन्मान केला जातो.

प्रत्येक शिक्षक त्याच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी दररोज बरेच परिश्रम घेतो. शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करण्यासठी नेहमी तत्पर असतात. ते विद्यार्थ्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वाट दाखवतात. म्हणून विद्यार्थ्यांना गुरुच्या या कार्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.

वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालये शिक्षक दिन वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. काही शाळांमध्ये या दिवशी विद्यार्थी स्वतः वेगवेगळ्या शिक्षकांसारखा पोशाख धारण करून लहान वर्गातील मुलांना शिकवून शिक्षक दिन साजरा करतात.

काही शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी विद्यार्थी विविध कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी अनेक कलाकृती सदर करून शिक्षकांचा सन्मान करतात, शिक्षकांचे त्यांच्या जीवनातील महत्व स्पष्ट करतात. शिक्षकांना नेक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करतात.

हा दिवस शिक्षकासाठी खूप आनंददायी असतो. त्याला आपल्या कष्टाच्या फळाची जाणीव करून देणारा असतो. त्याच्या निस्वार्थ कार्याचा गौरव या दिवशी केला जातो. खरंच एका शिक्षकाशिवाय विद्यार्थ्याचे जीवन हे दिशाहीन आहे.


शिक्षक दिन मराठी निबंध व भाषण Essay on Teacher’s Day in Marathi (३०० शब्दांत)

Set 4 is Helpful for Students of Classes 11, 12 and Competitive Exams.

प्रख्यात विद्वान, महान तत्वज्ञ, एक आदर्श शिक्षक आणि भारताचे द्वितीय राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांना कोण ओळखत नाही. राधाकृष्णन यांनी आपल्या सामाजिक आयुष्याची सुरुवात शिक्षक म्हणून केली होती. यानंतर, त्यांनी हळूहळू  ज्ञान आणि कार्यक्षमतेच्या बळावर इतर उच्च पदांचे प्रतिनिधित्व केल्यानंतर अध्यक्षपद स्वीकारले.

सर्वपल्ली एक प्रभावी शिक्षक आणि थोर व्यक्ती होते. ते नेहमीच आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीचा विचार करीत असत. कारण शिक्षक हेच राष्ट्राचे भविष्य घडवणारे आधारस्तंभ आहेत आणि सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीशिवाय राष्ट्राचा सर्वांगीण विकास शक्य नाही, हे त्यांना चांगल्या प्रकारे समजले होते.

जर शिक्षकास सन्मान आणि पुरेसे उत्पन्न मिळत नसेल तर राष्ट्राच्या विकासाबद्दल विचार करणे निरर्थक आहे, असे त्यांचे मत होते. म्हणूनच त्यांनी आपला वाढदिवस ‘शिक्षक दिन’ साजरा केला जावा अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो

शिक्षकांबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन संपूर्ण भारतात साजरा केला जातो. आईला प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिले गुरु मानले जाते. बालपणी मुले त्यांच्या आईकडून बोलायला शिकतात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षकाला खूप महत्व आहे कारण, आयुष्यात योग्य वाटेवर वाटचाल करून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षकच मार्गदर्शन करतात. शिक्षकच मुलांना देशाचे सुजाण नागरिक होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतात.

शाळेत तसेच महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यादिवशी विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना विविध भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करतात. विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना फुले देऊन त्यांचा आशीर्वाद घेतात आणि त्यांना अनेक शुभेच्छा देतात.

विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना नृत्य, नाटक यासारख्या त्यांच्या विविध कार्यक्रमाद्वारे खूप आनंदित करण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व पाहून शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांचा खूप अभिमान वाटतो. या दिवशी अनेक विद्यार्थी शिक्षकांसाठी भाषण करतात. विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व यावर ते भाषण देतात, अशा प्रकारे आनंदाने हा दिवस साजरा केला जातो. विद्यार्थ्याची ही कृतज्ञता पाहून शिक्षकाचे डोळे पाणावतात त्याला आपण केलेल्या कष्टाचे समाधान मिळते.

शिक्षक दिनामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते अधिक मजबूत होते. विद्यार्थ्याला शिक्षकाचे आपल्या जीवनातील महत्व आणि त्याचे आपल्या यशामागील योगदान याची जाणीव होते. म्हणूनच शिक्षकाच्या महान कार्याला समर्पित हा एक महत्वाचा दिवस आहे, कारण गुरुपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही.


शिक्षक दिन मराठी निबंध व भाषण Essay on Teacher’s Day in Marathi (४०० शब्दांत)

Set 5 is Helpful for Students of Classes 11, 12 and Competitive Exams.

माणसाच्या आयुष्यात गुरुचे महत्व अनन्य आहे. कारण गुरुच शिष्याचे आयुष्य घडवतो. म्हणूनच गुरूच्या या महान कार्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी देशभर शिक्षक दिन साजरा केला जातो.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

शिक्षक दिन हा भारतातील राष्ट्रीय उत्सव आहे. हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ समर्पित आहे. ते तत्ववेत्ता, राजकारणी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. शिवाय, विसाव्या शतकातील सर्वात नामांकित शिक्षक म्हणून त्यांचे स्मरण केले जाते.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ मध्ये आंध्र प्रदेशात झाला. त्यांचा असा विश्वास होता की केवळ योग्य प्रकारचे शिक्षण सर्जनशीलता आणि विश्लेषणात्मक कौशल्याला चालना देऊ शकते. ज्ञान मिळवण्याचा अर्थ म्हणजे व्यावहारिकपणे विचार करणे, सत्याचे पालन करणे आणि जमाव उत्कटतेला प्रतिकार करण्यासाठी एक वृत्ती उत्पन्न करणे होय.

राधाकृष्णनांचे कार्य

डॉ. राधाकृष्णन हे असे एक शिक्षक होते ज्यांनी नैतिक, आध्यात्मिक आणि बौद्धिकदृष्ट्या सुधारण्याचे समर्थन केले. ते प्रख्यात अभ्यासक आणि भारतरत्न पुरस्काराचे मानकरी होते. ते हिंदू धर्माचे समर्थक होते आणि तरुणांच्या मनाला हिंदू धर्माच्या रूपाने आकार देण्याची त्यांची इच्छा होती. जगाने त्याला आध्यात्मिक दृष्टिकोन असलेले एक उल्लेखनीय तत्ववेत्ता म्हणून ओळखले. त्यांचे वाचक त्यांच्या लिखाणातील कार्यामुळे मंत्रमुग्ध झाले आणि असा विश्वास होता की लोकांवर चांगला प्रभाव पाडण्याची क्षमता त्यांच्यात आहे.

शिक्षक दिन साजरा करण्याचे कारण

ते जगभरातील शिक्षकांसाठी एक आदर्श होते. राधाकृष्णन यांना माहित होते की शिक्षक हे देशाच्या विकासाचे आधारस्तंभ आहे, शिक्षक हेच देशाच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. म्हणूनच समाजात शिक्षकांचे महत्व कायम ठेवण्यासाठी त्यांनी जनतेला त्यांचा वाढदिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्याची विनंती केली आणि तेव्हापासून दरवर्षी ५ सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला.

शिक्षकाचे महत्व

शिक्षक संयम, करुणा आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. विद्यार्थ्याच्या आयुष्याला आकार देण्याची महत्वाची भूमिका शिक्षक बजावतात. पुराणामध्ये तर गुरूची तुलना देवाशी केली आहे, म्हणूनच स्कंद पुराणात असे म्हटले आहे,

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥

शिक्षक कधीही वर्ग किंवा जातीच्या आधारावर मुलांचे सीमांकन करीत नाहीत. त्यांच्यासाठी, प्रत्येक मूल समान आहे. ते चांगल्या किंवा वाईट विद्यार्थ्यांमध्ये कोणताही फरक न करता ते सर्वांना उज्ज्वल भावियासाठी प्रेरित करतात. अशक्त मुलांना आत्मविश्वासाच्या पृष्ठभागावर आणण्याचे महत्वपूर्ण कार्य ते करतात. सातत्याने केलेल्या प्रयत्नातून शिक्षक मुलांमध्ये जागरूकता आणि चैतन्य निर्माण करतात. ते मातीच्या भांड्याला जसा कुंभार आकार देतो तसाच विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्याचे मौल्यवान कार्य करतात.

शिक्षक दिन साजरा करण्याच्या पद्धती

शिक्षकाच्या या महान कार्याची कृतज्ञता म्हणून विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहाने शिक्षक दिन साजरा करतात. विद्यार्थी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सदर करून शिक्षकांचा सन्मान करतात. शिक्षकांना भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थी त्यांचा आशीर्वाद घेतात. विद्यार्थी या दिवशी आपल्या आवडत्या शिक्षकासारखा पोशाख धारण करून छोट्या वर्गांमध्ये शिकवण्यास जाऊन शिक्षकांना मानवंदना देतात.

सारांश

शिक्षकांसाठी हा दिवस खूप आनंददायी असतो. त्यांना आपल्या निस्वार्थ सेवाभावाबद्दल मिळालेला सन्मान पाहून खूप समाधान वाटते आणि विद्यार्थ्यांचा अभिमानही वाटतो. हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील निर्मळ नात्याचा आणि निस्वार्थ प्रेमाचा दिवस असतो. शिक्षकाचे विद्यार्थ्याच्या जीवनातील असणारे महत्व पटवून देणारा हा दिवस असतो.


तर मित्रांनो, शिक्षक दिन मराठी निबंध व भाषण Essay on Teacher’s Day in Marathi हा लेख तुम्हाला आवडलाच असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला सुद्धा हा निबंध Share करू शकता, धन्यवाद.


Share:

About Author:

या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषण, अनमोल विचार, आणि वाचण्यासाठी कथा मिळेल. तुम्हाला काही माहिती लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.